financial planning

सुस्वागतम

आर्थिक नियोजनाचे महत्व सर्वांना माहितीच आहे.  पैसा कसा कमवावा ह्याबरोबरच पैसा कसा वापरावा  आणि वाढवावा हे कळणे, ही श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली आहे.ज्या बंधू-भगिनींना हे समजण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी हा प्रयत्न आहे.

आर्थिक नियोजन :  एका उज्वल उद्यासाठी

आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते.  परंतु, पुढे कमावते झाल्यावर आणि जबाबदाऱ्या वाढल्या वर ह्या कमावलेल्या पैशाची आणि खर्चाशी सांगड घालताना आपल्या नाकीनऊ येतात.

पैसा कसा हाताळावा,  आर्थिक नियोजन म्हणजे काय,  त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी जेणेकरून आपण आपली व आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार करू शकतो,  या विषयावर आपण येथे चर्चा करू.