A friend in need is friend indeed. संकटकाळी उपयोगात येतो तो खरा मित्र. आजच्या धकाधकीच्या अनिश्चित काळामध्ये घरातल्या कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्याच्यावर आर्थिक दृष्ट्या अवलंबून असलेल्या कुटुंबाचे भविष्य अधांतरी राहते. अशा कठीण प्रसंगांमध्ये कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सबल करण्याचे महत्त्वाचे काम आयुष्य विमा करतो. एक प्रकारे संकटकाळी धावून येणारा मित्र म्हणाना.
अशा अतिशय महत्त्वाच्या आयुष्य विम्याविषयी आज आपण जाणून घेऊ.
सुनील एक 35 वर्षाचा विवाहित तरुण आहे. त्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे. सुनील ची पत्नी सुरेखा एका छोट्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. सुनील आणि सुरेखाने आपल्या मुलीसाठी उज्वल भविष्याची अनेक स्वप्ने रंगवली आहेत. आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणासाठी सुनील काही आरोग्य विमा पॉलिसी विकत घेतलेल्या आहेत. परंतु carona मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एक भीती त्याच्या मनात थैमान घालते आहे. दुर्दैवाने आपल्याला काही झालं तर सुरेखाचं आणि मुलीचं कसं होणार या विचाराने सुनील हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत त्याने काय करावे?. आज पर्यंत विमा उतरवणे म्हणजे प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स वाचवण्याचे एक साधन एवढाच विचार त्याने केला होता.
आज आयुष्य विम्याचे विविध प्रकार, आयुष्य विम्याशी निगडीत काही संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आपण समजून घेऊया जेणेकरून आपल्यातील काही सुनील ना त्याची मदत होईल.
चला आपण जीवन विमा समजून घेऊ.
सगळ्यात पहिलं म्हणजे विमा पॉलिसी. विमा पॉलिसी म्हणजे काय? विमा धारक आणि विमा देणारी कंपनी या दोघांमधला करार. विमाधारकचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना ठरलेली रक्कम देण्याची हमी विमा कंपनी या कराराद्वारे देत असते. त्याबदल्यात विमाधारक त्या कंपनीला दरवर्षी ठराविक रक्कम हप्ता म्हणून देत असतो. जेव्हा आपण विम्यासाठी अर्ज करतो त्यावेळी विमा धारकाची सर्व माहिती प्रामुख्याने वैद्यकीय माहिती , त्याच्या व्यवसायाचे स्वरूप, त्याचे राहायचे ठिकाण विमा कंपनीला दिली जाते. दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम कोणाच्या हवाली करावी हेदेखील या अर्जात नमूद करायचे असते. अर्ज करताना कंपनीने दिलेले विविध नियम आणि अटी या विमाधारकाने नक्की पडताळून पाहाव्यात.
पुढची महत्त्वाची संकल्पना म्हणजे विम्याची रक्कम. अर्थात Sum Assured. आपल्या पश्चात विमा कंपनीने किती रक्कम आपल्या कुटुंबाला द्यावी त्याचे उत्तर म्हणजे विम्याची रक्कम. सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे. कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला या रकमेचा आधार असतो. याचाच अर्थ ही रक्कम त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलाबाळांच्या आर्थिक उद्दिष्टांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मग एखाद्याने किती रकमेचा विमा घेणे योग्य ठरेल? त्यासाठी काही ठोकताळे आहेत का? वरच्या उदाहरणात सुनील ने आपल्या मुलींच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी तसे की शिक्षण लग्न, तसेच मुलीच्या आणि सुरेखाच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे, ह्या सर्वांचा विचार करायला हवा.
विम्याची मुदत. अर्थात Policy Term. म्हणजे किती काळासाठी विमाधारक विमा कंपनीशी करारबद्ध होत आहे. विमा विकत घेताना विमाधारकाच्या मनामध्ये त्याच्या कमावते असण्याच्या वयापर्यंत त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाची सोय व्हावी हा विचार असतो. त्यानुसार शक्यतो जोपर्यंत विमाधारकाला पैसे कमावण्याची क्षमता असेल आणि त्याच्यावर आर्थिक जवाबदारी असतील तोपर्यंत विमा उतरविला जातो. उदाहरणार्थ सुनील हा 35 वर्षाचा गृहस्थ आहे. ज्याचे निवृत्तीचे वय साठ वर्षे आहे, पुढची पंचवीस वर्ष आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवू शकतो. त्याच्यासाठी पंचवीस वर्षाचा विमा उतरवणे संयुक्तिक ठरेल. विमा पॉलिसीची सुरुवातीची तारीख आणि विमा पॉलिसी संपण्याची तारीख ज्याला आपण पॉलिसीची मॅच्युरिटी म्हणतो , या दोन्ही महत्त्वाच्या तारखा आहेत
यानंतर आपण विम्याच्या हप्ता विषयी बोलू. आपल्या मृत्युपश्चात विमा कंपनीने ठराविक रक्कम आपल्या कुटुंबाला द्यावी यासाठी जी रक्कम विमा कंपनीला द्यावी लागते ती म्हणजे विम्याचा हप्ता. हा हप्ता विमाधारकाच्या सोयीनुसार मासिक,त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असू शकतो. विमा हप्ता किती असावा हे विमा धारकाचे वय, त्याची तब्येत, त्याची शारीरिक क्षमता, त्याच्या कामाचे स्वरूप, आणि विम्याची मुदत या सर्वांवर अवलंबून असते. ठरलेल्या तारखेला विम्याचा हप्ता भरणे विमाधारकाला बंधनकारक असते. दिलेल्या मुदतीत विम्याचा हप्ता न भरल्यास घेण्याचा करार रद्द होऊ शकतो. आयुष्य विम्यासाठी भरण्यात येणाऱ्या हप्त्याची रक्कम ही विम्याच्या पूर्ण मदतीसाठी कायम राहते. म्हणजे सुनील नेम 35 व्या वर्षी पुढच्या पंचवीस वर्षाचा आयुष्य विमा वार्षिक 25000 हप्त्यावर घेतला असेल तर दरवर्षी 25000 रुपये भरेल. तो वाढणार नाही. यासाठी आयुष्य विम्याच्या हप्त्याला लेव्हल प्रीमियम असेही म्हणतात.
Premium Paying term म्हणजे किती वर्ष हप्त्याचे पैसे भरावे लागतील? वर सांगितलेल्या उदाहरणात सारखे जरी विम्याची मुदत पंचवीस वर्ष असली तरी पूर्ण पंचवीस वर्षे सुनील ने हप्ता भरावा की पुढची पंधरा वर्ष हप्ता भरून देखील पूर्ण पंचवीस वर्षाचा विमा उतरवता येईल, हे Premium Paying term दर्शवते.
विम्याच्या मुदतीच्या शेवटी मिळणारी रक्कम अर्थात मॅच्युरिटी बेनिफिट. विमाधारकाने घेतलेल्या विम्याच्या मदतीच्या सरतेशेवटी विमाधारक जिवंत असेल तर विमा कंपनीकडून त्याला जी रक्कम मिळते त्याला मॅच्युरिटी बेनिफिट असे म्हणतात. विम्याच्या पॉलिसी नुसार विम्याच्या मुदतीच्या शेवटी ही रक्कम एक रकमी म्हणजेच lumpsum किंवा टप्प्याटप्प्याने विमाधारकाला दिली जाते.
दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास मिळणारी रक्कम अर्थात death बेनिफिट. विम्याच्या मुदतीत जर विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्यू ओढवला तर ही रक्कम त्याच्या कुटुंबीयांना विमा कंपनीकडून दिली जाते.
विमा पॉलिसी मुदतपूर्व बंद केल्यास मिळणारी रक्कम अर्थात surrender value. काही कारणामुळे मुदतीपूर्वीच नेण्याची पॉलिसी रद्द करण्याचे ठरवले ज्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हणतात, तर जी रक्कम तुमच्या हातात दिली जाते ती म्हणजे सरेंडर व्हॅल्यू.
आपण आयुष्य विम्याशी निगडीत संकल्पनांचा विचार केला. आता आपण थोडक्यात आयुष्य विभागाच्या विविध प्रकारांविषयी बोलू.
सगळ्यात आधी, Term Policy.
आयुष्य विमा चा मुख्य उद्देश म्हणजे विमाधारकाच्या अनुपस्थित कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळण्याइतपत रक्कम मिळवून देणे. या संकल्पनेशी प्रामाणिक राहणारी ही टर्म पॉलिसी. शक्यतो अशा पॉलिसीमध्ये इन्शुरन्स हा विचार प्रामुख्याने केला जातो. दिलेल्या विम्याच्या हप्त्यातून जवळपास सर्व रक्कम इन्शुरन्स त्यादृष्टीने वापरली जाते.ह्या कारणामुळे टम पॉलिसीचा हप्ता हा इतर कुठल्याही पद्धतीच्या आयुष्य विम्यापेक्षा कमी असतो. अर्थातच कमी हप्ता भरून जास्त रकमेचा विमा आपल्याला term पोलिसी देते. आर्थिक नियोजनामध्ये या पद्धतीच्या आयुष्य विम्याचा उपयोग केला जातो. कुठल्याही पद्धतीची गुंतवणूक इथे विचारात घेतली जात नाही. अर्थातच त्यामुळे मदतीच्या शेवटी मॅच्युरिटी बेनिफिट विमाधारकाला काहीही मिळत नाही. परंतु पॉलिसी विकत घेण्याचे उद्दिष्ट या विमा प्रकाराने साधले जाते.
पुढील सर्व पॉलिसी प्रकार इन्शुरन्स आणि गुंतवणूक यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे term policy चा हप्ता आणि इतर पोलिसी प्रकारांचा हप्ता यात बरीच तफावत असू शकते. उदाहरणार्थ जर तीस वर्षाच्या सुदृढ गृहस्थाने पुढच्या तीस वर्षांसाठी 50 लाख रकमेची term policy घेतली तर त्याला वार्षिक दहा हजार रुपये हप्ता भरावा लागेल. तेवढ्याच रकमेच्या endowment पोलिसी साठी त्याला साधारण दीड लाख रुपये वार्षिक भरावे लागतील.
Endowment Policy
या विमा प्रकारांमध्ये विम्याच्या हप्त्याचा काही भाग इन्शुरन्स साठी तर काही भाग गुंतवणुकीसाठी वापरला जातो. जेणेकरून विमाधारकाला त्याच्या sum assured बरोबरच अधिकची रक्कम मिळू शकेल. मुदतीच्या शेवटी अशी रक्कम मिळत असल्यामुळे विमा धारकांची अशा प्रकारच्या पॉलिसींना पसंती असते.
ठराविक मुदतीत पैसे परत देणाऱ्या पोलिसी अर्थात मनी बॅक पॉलिसी.
या पद्धतीच्या पॉलिसीमध्ये ठराविक काळामध्ये एकंदर विम्याच्या रकमेच्या काही टक्के रक्कम विमाधारकाला दिली जाते. जसे की जर एकंदर पोलिसी ची मुदत 20 वर्षांचे असेल, तर पाच वर्ष, दहा वर्ष, आणि पंधरा वर्षाच्या टप्प्यांवर विमाधारकाला एकंदर विम्याच्या रकमेच्या 20 टक्के रक्कम दिली जाईल, आणि वीस वर्षांच्या सरतेशेवटी उरलेली रक्कम त्याला परत करण्यात येईल.
निवृत्ती साठीच्या पॉलिसी अर्थात पेन्शन प्लॅन
सेवानिवृत्तीनंतर दरमहा ठराविक रक्कम मिळत रहावी हा या प्रकारच्या पॉलिसींचा मुख्य उद्देश असतो. दिलेल्या मुदतीमध्ये दरवर्षी विमाधारक विम्याचा हप्ता भरतो. त्यात त्याला विमा कवच तर मिळतेच आणि उरलेली रक्कम निवृत्तीच्या दृष्टीने गुंतवणूक केली जाते. निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या रकमेतून दरमहा ठराविक रक्कम विमाधारकाला मिळते. त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला आणि तिच्या नंतर उरलेली रक्कम त्याच्या कुटुंबीयांना देण्याची तरतूद देखील ह्या पॉलिसीमध्ये असते.
शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी अर्थात ULIPs
इतर सर्व आयुष्य विमाप्रकारांपेक्षा वेगळा असा हा पॉलिसी प्रकार आहे. जास्त जोखीम घेणाऱ्या आणि त्यातही आयुष्य विमा शोधणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. विम्याच्या हप्त्यातून काही भाग शेअर बाजार मध्ये गुंतवला जातो. अर्थातच इतर प्रकारांपेक्षा मुदतीच्या शेवटी अधिक परतावा देण्याची क्षमता या प्रकारांमध्ये आहे.
तर मंडळी आज आपण आयुष्य विम्याशी निगडित विविध संकल्पना पहिल्या. विमा पॉलिसींचे विविध प्रकारही पाहिले. आता वेळ झाली आहे सुनील च्या गृहपाठाची. त्याच्याकडे असलेल्या सर्व आयुष्य विमा पॉलिसींचे नोंद त्याने करायची आहे. तुम्हीही तुमच्याकडे असलेल्या सर्व आयुष्य विमा पॉलिसींची नोंद करणार आहात. प्रत्येक पॉलिसीसाठी कंपनीचे नाव, पॉलिसीचा प्रकार, विमा सुरू होण्याची तारीख, विम्याची मुदत संपण्याची तारीख, विम्याची रक्कम, विम्याचा हप्ता, हप्ता भरण्याची तारीख, मुदतीच्या शेवटी मिळणारी रक्कम ही माहिती त्या तक्त्यामध्ये असेल.
चला तर मग, लागा कामाला. आपला पुढचा एपिसोड येण्याआधी तुमच्याकडे तुमच्या सर्व आयुष्य विमा पॉलिसी ची माहिती तयार करा.
Leave a Reply