Description
आपल्याकडे एक म्हण आहे केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आपल्या सर्वांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व आणि गरज हे पटलेले आहे. आपले स्वतःचे आर्थिक नियोजन आपण स्वतः केले तर कसे?
या विचाराने प्रेरित होऊन ज्या लोकांना आर्थिक नियोजन प्रत्यक्ष कसे करतात हे शिकण्याची इच्छा असेल अशा लोकांसाठी आम्ही ‘बी युवर ओन लाईट’ ही आठ तासांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेमध्ये एक उदाहरण घेऊन त्या कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कसे करावे हे शिकवले जाईल. यात आर्थिक नियोजनाशी निगडीत अशा अनेक संकल्पना जसे महागाई, उद्दिष्ट प्रमाणे पैशांचे नियोजन इत्यादी शिकवले जाईल. हे संपूर्ण आर्थिक नियोजन आपण एक्सेल वापरून करणार आहोत.
या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आर्थिक नियोजनाचे ज्ञान असणे अपेक्षित नाही. एक्सेल विषयी बेसिक माहिती आणि शिकण्याची इच्छा या दोनच गोष्टी पुरेशा आहेत.
‘बी युवर ओन लाईट’ ह्या कार्यशाळेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे चौकशी करा.
Reviews
There are no reviews yet.